रुपेश अरविंदक्षण
वास्तवात, कल्पनेत, वा भावनांच्या पातळीवर - कुठल्याही धावणाऱ्या किंवा उडणाऱ्या गोष्टींच्या वेडाचं इंधन वापरून गेली जवळपास वीस वर्षं रुपेश अरविंदक्षण यांनी ऑटोमोबाईल डिझायनर म्हणून काम केलं आहे. भविष्यातल्या स्वप्नवत गाड्या आज डिझाईन करणं, घरादाराचा (लोभस?!) गोंधळ सांभाळणं, आणि आपल्या दोन वर्षांच्या पोरामागे धावणं - या सर्वांतून वेळ काढून (चोरून?!) ते रेखाटनं करतात, लिहितात, आणि स्वतःच्या मनातल्या गोष्टींना मूर्त आकार देतात.