केतन बंगाल

केतन बंगाल

मी केतन बंगाल

मुंबईत वास्तव्यास आहे. मला डीटीपी, पेज सेटिंग आणि पुस्तकं तसेच नियतकालिकांची कव्हर्स आणि आतील पानांची मांडणी या कामांचा पंधरा वर्षांचा अनुभव आहे.

मी सध्या एका प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रात डिझायनरचं काम करतो. याशिवाय वेगवेगळ्या मराठी, हिंदी, इंग्रजी प्रकाशनांसाठी पुस्तकं, नियतकालिकं, दिवाळी अंक वगैरेंचं डिझाईन करण्याचं काम करतो.

मी कव्हर्स आणि आतील पानांची मांडणी केलेल्या अनेक पुस्तकांना नामांकित संस्थांचे पुरस्कार लाभलेले आहेत.