जलपर्णीच्या नशिबाचे साडेतीन फेरे

आनंद साधले यांच्या आनंदध्वज या मानसपुत्रावर आधारित आदूबाळानं लिहिलेली पहिली चाहतिका

Thu Oct 22

भास २०२६मध्ये आदूबाळानं ‘केंजळगडाचा कबजा’ या कथेत आनंदध्वज नामक चलाख आणि रंगेल इसमाच्या डोकेबाज सल्ल्यांविषयीची एक धमाल कथा रचली आहे. आनंदध्वज हा खरा आनंद साधले यांचा मानसपुत्र. शृंगारप्रांतातल्या अडचणी स्मूथली, या कानाच्या त्या कानाला कळू न देता, सस्मितमुद्रेनं, आणि सहजी सोडवून देणारा. मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘आनंदध्वजाच्या कथा’ या संग्रहात त्याच्याविषयीच्या मूळ कथा वाचायला मिळतात.

२०१६ साली आदूबाळानं आनंदध्वजावर आधारलेली पहिली फॅनफिक उर्फ चाहतिका ‘ऐसी अक्षरे’ या मराठी संस्थळावर प्रकाशित केली. ‘केंजळगडाचा कबजा’ ही त्या पात्रावर आधारित दुसरी फॅनफिक उर्फ चाहतिका. उत्सुक वाचकांना ‘जलपर्णीच्या नशिबाचे साडेतीन फेरे’ ही पहिली चाहतिका वाचायची असल्यास, ही लिंक: https://www.aisiakshare.com/node/5207